◾निलेश कदम यांच्या कडून बांदा प्राथमिक आरोग्य क्रेंद्रास आरोग्य विषयक साहीत्य भेट..

 

◾निलेश कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपक्रम..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा, दि-१८ :- बांद्यातील युवा नेतृत्व निलेश कदम यांनी आपल्या वाढदिवसाचे ओचित्य साधून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी महत्वाचे असणारे तीन ॲडव्हान्स पारा, ऑक्सिमीटर, इन्फ्रेड थर्मल गन,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे असणारे ग्लोज आणि सॅनिटायझर असे आरोग्य विषयक आवश्यक साहीत्य वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील व डॉ.मयुरेश पटवर्धन यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी बांदा सरपंच अक्रम खान,नेमळे सरपंच विनोद राऊळ,डॉ.जगदीश पाटील,डॉ.मयुरेश पटवर्धन, बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले,तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत,माजी सरपंच बाळा आकेरकर, हुसेन मकानदार,ग्रामपंचायत सदस्य शामसुंदर मांजरेकर, राजेश विर्नोडकर,जावेद खतीब,अण्णा पाटकर,नुपूर मोर्ये,नागेश बांदेकर,प्रणय येडवे आदि उपस्थित होते.

निलेश कदम हे बांदा गावातील युवा नेतृत्व असून यांनी सध्याची कोरोनो माहामारी ची परिस्थिती ओळखून स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी केक न कापता या कठीण काळात वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांसाठी केलेली मदत केली. निलेश कदम यांनी अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केल्यामुळे भविष्यात बांद्यातील युवकांना हा संकल्प प्रेरणादायी असल्याचे दिसुन आले.

निलेश कदम म्हणाले,सध्याच्या कोरोनो च्या कठीण परिस्थितीमध्ये संपूर्ण देशभरात या व्हायरस ने थैमान घातले आहे. अशावेळी केवळ शासन , लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संस्थाच मदत करतील ही अपेक्षा न धरता आपणही या कठीण काळात जमेल ती मदत करून प्रशासनास मदत करणे हे कर्तव्य आहे.हाच संकल्प घेऊन मी एक माझं कर्तव्य केलं आहे.माझ्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील इतर युवकही प्रेरणा घेऊन मदतीचा हात प्रशासनास देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या काळात स्वतः ची काळजी स्वतः घेतली पाहीजे असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!