आणखीकृषिकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾तौत्के चक्रीवादळाच्या रौद्र अवताराने बांदा शहराला अक्षरशः काढलं झोडपून..

 

◾काजू,आंबा,शेतीबागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

 ✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा, दि-१८ :- बांदा दशक्रोशीला सोसाट्याच्या वारा, मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट, मध्येच अवकाशात चमकणारी वीज दिवसभर चाललेल्या तौत्के चक्रीवादळाच्या या रौद्र अवताराने अक्षरशः झोडपून काढलं. परिसरातील काजू, आबा, शेतीबागायतीचे अतोनात नुकसान झाले. विलवडे, वाफोली, डिंगणे, डेगवे, शेर्ले, इन्सुली, तांबुळी, भालावल, कोनशी, नेतर्डे,डिंगणे याभागातील फणस कोकम, काजू कलमे, केळी बागायती, पपई, नारळाची झाडे उन्मळुन पडून आदी पिके जमिनदोस्त झाले. यामध्ये दशक्रोशीतीत कोटीच्या घरात नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. महसुल,कृषी विभागाचे पंचनामे प्रत्येक गावात सुरु असल्याचे समजते. चक्रीवादळामुळे बांदा शहरात व दशक्रोशीत सर्वच ठिकाणी झाडे उन्मळून विद्युत पोलवर पडली. तसेच वीज खांबही उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये विजवितरण कंपनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र रविवारी भर वादळात बांदा वीज वितरण अधिकारी सुभाष आपटेकर आणि त्यांचे सर्व सहकारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत होते. गेले दोन दिवस अहोरात्र मेहनत घेत असून बांद्यातील काही भाग वगळता शहरी भागातील व वस्तीतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.काही उर्वरित भागात मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून ते कामही युद्धपातळीवर सुरू असून लवकरच त्या भागातील वीजपुरवठाही सुरळीत होईल अशी माहीती विज वितरण विभागाकडून देण्यात आली आहे. . वाफोली, विलवडे, भालावल, तांबुळी, डेगवे गावात विज लाईनवर मोठी झाडे उन्मळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावात व शेजारील गावे विज खंडीत झाल्याने काळोखात आहे. सदर गावाचे विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर सुरु आहे. मंगळवारी दिवसभर सोसाटेचा वारा, व मुसळधार पावसामुळे कामात अडथळा येत आहे. या गावात मंगळवारी सायकांळपर्यर विज पुरवठा सुरळित होणार आहे. नेतर्ड, डिंगणे, डोंगरपाल, गाळेल परिरातील विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अजुन दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वितरण विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!