◾कुडाळच्या फ्रेंड सर्कल हेल्पिंग हॅंड ग्रुपचा गरजवंताना मदतीचा हात..
◾कोरोणाच्या कठीण काळात सुध्दा सुरू आहे अविरहित मदतीचा ओघ..
◾फ्रेंड सर्कल हेल्पिंग हॅंड ग्रुप ठरतोय परिस्थितीने गांजलेल्या कुटुंबांचा आधार..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴कुडाळ, दि-१४ :- कुडाळचा “फ्रेंड सर्कल हेल्पिंग हॅंड ग्रुप” नेहमीच गरजवंताच्या मदतीला धावून जात असतो गेली दोन वर्ष सुरू असलेले हे त्याचं मदतकार्य कोरोणाच्या कठीण काळात सुध्दा अगदी अविरहीत सुरू आहे. आज त्यांनी एकाच दिवशी दोन गरजू कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे.
कुडाळ दत्त मंदिर येथील पुजारी नारायण बाकरे यांच्या आई सुमती बाकरे यांच्या डाव्या बाजूच्या मणक्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. त्या सध्या डॉक्टर परुळेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांच्या शस्त्रक्रियेकरीता ६५०००/- एवढा खर्च आहे. त्याचप्रमाणे तेर्सेबांबर्डे येथील धोंडी सुधाकर धुमक यांच्यावर हल्लीच अन्ननलिकेची शस्त्रक्रिया झालीय त्यांच्या घरात ते एकुलतेएक कमावते आहेत व दोन मुलं पत्नी असा परिवार त्यांच्या गाठीला आहे. या दोन्ही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे व त्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे ही बातमी या ग्रुप पर्यंत पोचली व ताबडतोप या दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत करायची या ग्रुपने निश्चित केले. या दोन्ही कुटुंबांना त्यांच्या घरी जावून प्रत्येकी १५०००/- एवढी रोख रक्कम मदत स्वरूपात त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. यावेळी या ग्रुपचे सदस्य अजित खंडे, सदा अनावकर, रुपेश कानडे, अवधूत देसाई, गुरू गडकर, शुभम देसाई, चंदन कांबळी, सुनील कोळकर, सुधीर चव्हाण हे उपस्थित होते.
कोणतीही अपेक्षा मनात न ठेवता अगदी निःस्वार्थपणे सुरू असलेले हे या ग्रुपचे कार्य निश्चितच कौतुास्पद आहे त्यांचे हे कार्य बगून अनेक युवक, सामाजिक कार्यकर्ते या ग्रुपशी जोडले जात असून दिवसेंदिस या ग्रुपची व्याप्ती वाढत चालली आहे.
परमेश्वर या ग्रुपच्या सर्व सदस्यांना निरोगी दीर्घायुष्य देवो व त्यांनी घेतलेल्या या सामाजिक सेवेच्या व्रतात अधिक ताकत देवुन अजून मोठमोठी सामाजिक कार्ये या ग्रुपचा माध्यमातुन पूर्णत्वास जावीत अशा या ग्रुपला सदिच्छा.
“कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज” चॅनेल नेहमीच “फ्रेंड सर्कल हेल्पिंग हॅंड” ग्रुपच्या सामजिक कार्याची दखल घेत असते व त्यांचे हे समाजकार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुध्दा आमच्या चॅनेल असतो. जेणेकरून या ग्रुपच्या कार्यातून इतर ठिकाणच्या तरुणांनी प्रेरणा घेवुन असे अनेक ग्रुप समाजात निर्माण व्हावेत व परिस्थितीने गांजलेल्या लोकांपर्यत मदतीचा हात पोचावा.

