◾कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलीस स्टेशनला जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली भेट..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-१४:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलीस स्टेशनला जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी गुरुवारी भेट दिली. कोरोना संसर्गा बाबत वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडून सविस्तर आढावा घेतला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई व पोलीस कर्मचारी उपास्थित होते.
जिल्हा प्रशासनाने कडक लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी बाजारपेठेतील दुकाने बंद आहेत की नाही याची खात्री केली. त्याच प्रमाणे बाजारामध्ये विनाकारण फिरणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. वैद्यकीय कारणासाठी ई पास सवलत देण्यात येईल, अन्य कोणत्याही प्रकारच्या प्रवासासाठी ई पास सवलत दिली जाणार नाही अशा सक्त सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या.
वैभववाडी बाजारपेठेतील रास्त धान्य दुकानदार यांनी कोविड चाचणी केली की नाही याबाबत दुकानदार यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर सांगूळवाडी येथील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार पाटोळे यांच्याकडून आरोग्याच्या सोयी सुविधा बाबत सविस्तर माहिती घेतली. त्याच प्रमाणे ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग बाबत शासकीय नियमांचे कडक अंमलबजावणी करावी असा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे आचिर्णे गावाला भेट देऊन गावातील समस्यांबाबत पोलीस पाटील यांच्याशी चर्चा केली.गावामध्ये कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी शासकीय नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.

