◾जिल्ह्यात आज एकूण १३ हजार ७३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले..
◾सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ७७ रुग्णांवर उपचार सुरू ; तर जिल्ह्यात आणखी ४२९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह
◾प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली माहिती..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१४ :- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १३ हजार ७३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान आज नऊ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर जिल्ह्यात आणखी ४२९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आकेरी-कुडाळ येथील ५५ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. सावंतवाडी येथील ८० वर्षीय महिला आहे. तिला हृदयरोगाचा त्रास होता. फोंडाघाट-कणकवली येथील ५५ वर्षीय महिला आहे. तिला मधुमेहाचा त्रास होता. वळिवंडे देवगड येथील ३० वर्षीय पुरुष आहे. त्याला रक्तविकाराचा त्रास होता. सोनाळी-वैभववाडी येथील ८० वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास होता. तळवडे-सावंतवाडी येथील ६५ वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. रोनापाल सावंतवाडी येथील ७० वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. हुंबरट – कणकवली येथील ७० वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. आंबोली- सावंतवाडी येथील ५६ वर्षीय पुरुष आहे. त्याला फुफ्फुसविकाराचा त्रास होता. या ९ जणांचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला आहे.

