आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾फुकेरी हनुमंत गड ठरणार पर्यटकांचे आपर्षण..

 

◾विविध गडसेवकांच्य संयुक्त विद्यामाने संवर्धनाचे काम सुरु ; यात ४० तरुणांचा सहभाग

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴 दोडामार्ग,दि-१४ :- श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना गडकोटांच्या माध्यमातुन केली. सिंधुदुर्ग जिल्हयातील दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी गावात हनुमंत गड हा त्यापैकी एक आहे. दुर्लक्षीत राहिल्याने तो ठिकठिकाणी ढासाळून गेल्याचे चित्र तेथे पहायला मिळते. या गडाचे संवर्धन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा स्तुत्य संकल्प सोडला असुन ते पर्यटकांचे आकर्षण ठरणार असल्याची माहिती येथिल गडसेवकांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग च्या प्रतिनिधीला भेटी दरम्यान दिली.

युवा गडसेवक वैभव आईर यांनी दिलेल्या माहिती नुसार , पांडव कालिन असलेला ह ऐतिहासीक गड नामशेष होण्याच्या मार्गावर होता. याची दखल घेऊन फुकेरी येथिल श्री देवी माऊली सांस्कृतीक कला व क्रिडा मंडळ, सह्यादी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक श्रमिक चंद्रशेखर गोजस गंडे व सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश दत्ताराम रघुवीर आणि सिंधुदुर्ग विभागातील जेष्ठ गडसेवक आदींच्या संयुक्त विद्यामाने हनुमंत गड संवर्धनाचे काम हल्लीच हाती घेण्यात आले आहे.

या मोहिमेत येथील तरुण, तरुणी, जेष्ठ जाणकार मंडळी आदी संघटीत रित्या या गडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासठी रात्रंदिवस झडत आहेत. यात मुंबई व गोव्यातील गडसेवकांचाही सामावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रुंशी झुंज देण्यासाठी हा गड उभा केला होता. पूर्वी संपुर्ण कोकण व गोवा भागाची टेहळणी याच हनुमंत गडावरून केली जात असे. हा गड फुकेरी गावापासून अंदाजे ४ ते ५ किलोमीटर आहे. गडा पर्यंत जायला पक्का रस्ता नसल्याने तिथपर्यंत जायला जंगलातुन पायीच प्रवास करावा लागतो. या गडाची उंची ८२० फूट आहे. त्याला एक मुख्य दरवाजा , अन्य दोन दरवाजे व एक दिंडी दरवाजा आहे. ते तेथील मातित गाडले गेले होते. तसेच पाच पाण्याच्या टाक्या, श्री पिस्त्रा देवीचे मंदीर , गडाच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या होत्या. अनेक वर्षे हा गड दुर्लक्षित राहिल्याने तो अत्यंत दयनिय स्थितित दिसुन येत होता. त्याचे संवर्धन व्हावे असे तेथील युवा मंडळींना वाटल्याने या गडाचे काम हाती घेण्यात आले आहे. अजुनही बरेच काम बाकी आहे.

उपलब्ध माहिती नुसार गेल्या नोव्हेंबर २०२० पासून संवर्धन कामाची सुरुवात झाली. सह्याद्री प्रतिष्ठान च्या ८ ते १० दुर्गसेवकांनी याकामी उत्साह दाखविला होता. आता गडसेवकांची संख्या वाढली आहे. सध्या ही संख्या ४० च्या घरात पोचली आहे. यात मुंबई गोवा येथील युवावर्गही नि:स्वार्थपणे सहभागी होत आहेत. येथील काम पूर्ण झाल्या नंतर या गडाचा पर्यटन स्थळ म्हणून विचार होवू शकतो.

पूर्णपणे मातिच्य ढिगार्‍याखाली सापडलेला या गडाचा मुख्य दरवाजा मातितून अलग केला आहे. गडावर विजेची सोय नाही, कडक उन्हात काम करणे सेवकांना जोखमीचे ठरते तरी नि:स्वार्थी पणे त्यांनी स्वत:ला यात वाहून घेतले आहे.

विजेची सोय नसल्या मूळे जनरेटरच्या साहाय्याने रात्री उशीरा पर्यंत तेथे काम चालू असते. यात मोठे दगड बाजूला करणे , कित्येक वर्षे मातित गाठलेल्या तोफा अलग करून त्या साफ करण्याचे काम चालू आहे. अन्य बरीच कामे बाकी आहेत. गड संवर्धन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी मोठ्या निधिची आवश्यकता आहे.

आयोजन समितीच्या वतीने असे आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी सुनील राऊळ (८८०५१४१६११) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच हनुमंत गड संवर्धन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या या महान कार्यास आर्थिक मदत करायची असेल तर योगेश आईर यांच्याशी (९८२२१०२४०१) या क्रमांकावर संयर्क साधु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!