◾आंब्रड येथील उपकेंद्रात लसीकरणाला सुरूवात..
◾लसीकरण केंद्रावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल, दि-१४ :- कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथील उपकेंद्रात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य लाँरेन्स मान्येकर , पंचायत समिती सदस्य अरविंद परब, आंब्रड सरपंच विठ्ठल तेली, उपसरपंच विजय परब, वैद्यकीय अधिकारी डॉ श्रेया निगुडकर ,आरोग्य सेविका प्रमिला गोसावी आरोग्य सेवक फिलिप परेरा डाटा ऑपरेटर प्रीती राऊळ आदी उपस्थित होते .
जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर यांच्या पाठपुराव्यामुळे आंब्रड उपकेंद्रात लसीकरण सुरू झाले आहे. या केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना पहिला व दुसरा डोस असे एकूण ३३० नागरिकांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे.

