◾रत्नागिरी जिल्ह्यात निर्बंध कडक करण्याबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार ; पालकमंत्री अनिल परब
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-१४ :- रत्नागिरी जिह्यात कडक निर्बंध बाबत आज जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा झाली आहे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध किती कडक करायचे किंवा काय निर्णय घ्यायचा याबाबत येत्या दोन तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच आज रत्नागिरी उद्यमनगर येथिल महिला रुग्णालय कोविड सेंटरच्या फेज २ च्या कामाची पाहणी पालकमंत्री ना,अनिल परब,मंत्री ना,उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदींनी केली पाहणी.व या ठिकाणी लवकरच रुग्ण दाखल करण्यास सुरुवात केली जाईल असे ना,परब म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर महिला रुग्णालय येथे वाढीव बेड उपलब्ध करून रुग्णांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.हे काम युद्धपातळीवर सुरु असून या कामाचा आढावा घेत मंत्री महोदयांनी आवश्यक त्या सूचना प्रशासनाला देत कोरोना नियंत्रणासाठी सज्ज राहावे असे आदेश दिले .यावेळी आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आरोग्य सभापती उदय बने, नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ,इंदुराणी जाखड,अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे , पोलिस अधीक्षक डॉ,मोहीत कुमार गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबीता कमलापूरकर,आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

