◾परराज्यातून येणाऱ्यांना ४८ तासांचा कोरोना निगेटिव्ह अहवाल बंधनकारक..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई,दि-१४:- राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊन १ जूनपर्यंत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या व्यक्तीला ४८ तासाच्या आत तपासणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आलेला आहे. “ब्रेक द चेन” अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध १ जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची नियामवली जाहीर करण्यात आली आहे.

