◾आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा..
◾भिमनगर परिसरातील गरजुंना प्रत्येकी रोख ५०० रुपये आणि एक किलो साखर देत केला वाढदिवस साजरा..
◾घोटगे येथिल प्रविण पाडुरंग दळवी आणि कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१३ :- कोरोना वैश्विक महामारिच्या काळात प्रत्येक जण जिथे स्वतःचा विचार करत आहे त्याच समाजात असेही लोक अजुनही आहेत जे स्वतः बरोबर इतरांचाही विचार करतात.याचाच अनुभव घोटगे गावातील भिमनगर परिसरात राहणाऱ्या लोकांना आला.घोटगे गावातील पाडुरंग दळवी यांचे सुपुत्र आणि सध्या वास्तव्यास मुबंई येथे राहणारे प्रविण दळवी यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिनी अनावश्यक खर्च न करता ती मदत म्हणुन देण्याचा निर्णय घेतला आणि हातावर पोट असणाऱ्या भिमनगर परिसरातील गरजुंना प्रत्येकी ५०० रुपयांची रोख मदत आणि एक किलो साखर वाटप केली. यावेळी त्यांच्या आई प्रभावती दळवी संतोष दळवी आणि सासु विद्या सावंत आदि उपस्थित होत्या प्रविण दळवी आणि कुटुबियांनी जपलेल्या या सामाजिक बांधिलकी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

