आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾लस घेण्यासाठी जाणाऱ्या उसप जाधववाडी व केरकरवाडी येथील नागरिकांसाठी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ, मुंबई तालुका शाखा दोडामार्ग अध्यक्ष श्री. शंकर झिलू जाधव यांच्याकडून गाडीची व्यवस्था

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शंकर जाधव

🎴दोडामार्ग, दि-१३ :- कोविड १९ ची लस ही १८ ते ४५ आणि ४५ च्या पुढील वयोगटातील नागरिकांना दिली जात आहे. कडक लॉकडाऊन असल्याने लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खासकरून अतिदुर्गम ग्रामीण भागातील.

उसप येथील नागरिकांची कोविड लस कोविड घेण्यासाठी  लसीकरण केंद्र दोडामार्ग याठिकाणी  जाण्यासाठी वाहना नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली ही समस्या लक्षात घेत उसप गावातील सुपुत्र तथा सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ, मुंबई तालुका शाखा दोडामार्ग अध्यक्ष श्री. शंकर झिलू जाधव यांनी उसप जाधववाडी आणि केरकरवाडी येथील लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी बुधवारी ( दि.१२ मे ) स्वताच्या गाडीतुन नागरिकांना घेऊन गेले. लसीकरण केंद्रात या नागरिकांना सर्व सहकार्य केले आणि पुन्हा त्यांना घरी आणून सोडले श्री जाधव यांनी वाहनाची व्यवस्था करत त्यांच्या समवेत ते स्वतः कोविड लसीकरण केंद्र दोडामार्ग ठिकाणी वेळेत नागरिकांना लस मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांचे येथील ग्रामस्थांतून आभार व्यक्त केले जात आहे.

दोडामार्ग तालुक्यातील मागासवर्गीय समाजातील नागरीकांना लसीकरण केंद्रवर लस घेण्यासाठी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नसेल तर आपल्याला नक्की कळवा वाहनाची तात्काळ व्यवस्था केली जाईल व आवश्यक ते लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल यासाठी 9768356597 या मोबाईल नंबर द्वारे संपर्क साधावा असे उसप गावचे सुपुत्र तथा सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ, मुंबई तालुका शाखा दोडामार्ग अध्यक्ष श्री. शंकर झिलू जाधव यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!