आणखीआरोग्यकोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾जि.प.आरोग्य सभापतींच्या मतदार संघातच लसींचा तुटवडा..

 

◾जि. प. मेगा भरती आपल्या कडे द्यावी अशी मागणी करणाऱ्यांनी आधी स्वतः च्या मतदार संघात लसिंचा पुरवठा करावा

◾दहा ते पंधरा गावांचा अधीभार असलेल्या साटेली – भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी फक्त ८० लसी तर उसप उपकेंद्रासाठी तब्बल १५० लसी उपलब्ध

◾लसीसांठी राजकारण करणाऱ्या आणि लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या राजकारण्यांना जनता कधिच माफ करणार नाही ; म.न.वि.से तालुकाध्यक्ष अक्षय कुबल

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१३ :- संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लसींच्या पुरवठ्याबाबत घोळ चालु असुन आता त्याला राजकारणाचा वास येत आहे.सत्ताधारी राजकारणी आपल्या राजकिय बळाचा वापर करुन आपापल्या मतदार संघात लसी पळवण्याचे काम करित आहे.याचाच प्रत्यय आज सकाळी आला साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य ज्या आरोग्य कोंद्रावर दशक्रोशीतील गावे अवलंबुन आहेत अशा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी केवळ ८० लसी मिळतात तर उसप सारख्या उपकेंद्रासाठी १५० लसी मिळतात म्हणजे कुठेतरी राजकारण करुन आपापल्या मतदार संघात लसी पळवण्याचे कार्य ही राजकारणी मंडळी करत आहे.जि.प चे आरोग्य सभापती पद भूषवणाऱ्या डॉ.अनिषा दळवी यांच्याच मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्राची ही अवस्था आहे. त्यामुळे इतर भागातील अवस्थेचा विचार न केलेलाच बरा.

जि.प.मेगा भरतीचे अधिकार जि.प. कडे मागणाऱ्या सभापतींनी अगोदर राजकारण विरहीत लस पुरवठा करावा आणि नंतर भरतीचे अधिकार मागावेत.लोकांच्या आरेग्याशी खेळणाऱ्या आणि लस वाटपात राजकारण करणाऱ्या आणि निवडणुकीपुरती मतदार संघात तोंड दाखवणाऱ्या राजकारण्यांना जनतेने आता ओळखण्याची आणि त्यांची जागा दाखवुन देण्याची वेळ आलेली आहे.

लसीसांठी राजकारण करणाऱ्या आणि लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या राजकारण्यांना जनता कधिच माफ करणार नाही असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अक्षय कुबल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगीतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!