◾चराठा गावाला देखील लस उपलब्ध करून द्यावी ; ग्रामपंचायत सदस्य अमित परब
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१३-: तालुक्यातील चराठा या गावात गेल्या ७ ते ८ दिवसात कोरोनाने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. सावंतवाडी शहराच्या बाजूलाच हे गाव वसले असल्याने शहरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. आज कोलगाव ला २३० तर माजगाव ला १०० लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चराठा गावाला देखील लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी चराठा गावचे ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी केली आहे.

