आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾कोरोना ड्युटीवर जाणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला लस दिल्याशिवाय ड्युटी देऊ नये, तसेच १५ दिवसांऐवजी जास्तीत-जास्त ५ दिवसच ड्युटी लावण्यात यावी ; माजी शिक्षण व आरोग्य सभापती तसेच जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री.गुरुनाथ पेडणेकर यांची संबंधित विभागाला विनंती

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक

 🎴बांदा, दि-१२:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होत असताना जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षक आज कोरोना महामारीमध्ये खारेपाटण,आंबोली,फोंडा,बांदा तसेच इतर ठिकाणी‌ जिल्ह्याच्या सिमेवर आणि आरोग्य केंदांवर काम करत आहेत ‌मात्र आतापर्यंत या शिक्षकांना कोणत्याही प्रकारची लस दिली गेली नाही, तसेच मुख्याध्यापक यांच्याकडून कार्यमुक्त आदेशही दिला जात नाही.आज यात शिक्षकांचा बळी जात आहे अनेक शिक्षकांना कोरोना झाला आहे,३८ वर्षांच्या शिक्षकाचा सुद्धा कोरोनाने हकनाक बळी गेलेला आहे, यासाठी कोरोना ड्युटीवर जाणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला लस दिल्याशिवाय ड्युटी देऊ नये,असे जबरदस्तीने ड्युटीवर पाठवून त्या शिक्षकाचे बरे-वाईट‌ झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहणार आहेत.त्याचबरोबर १५ दिवसांऐवजी जास्तीत-जास्त ५ दिवस ड्युटी लावण्यात यावी यासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसिलदार आणि गटशिक्षणाधिकारी त्याचबरोबर मा.जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करुन तसे आदेश शिक्षकांना देण्यात यावे असे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तसेच जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे माजी जिल्हा अध्यक्ष श्री. गुरुनाथ पेडणेकर यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!