आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

◾नाधवडे येथील आरोग्य उपकेंद्रात आज पासून लसीकरणाला सुरुवात..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-१२:- नाधवडे येथील आरोग्य उपकेंद्रात आज लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, बंडूकाका मुंडल्ये, माजी सरपंच अनिल नारकर, चेअरमन रवींद्र गुंडये, उपसरपंच बाळू कांबळे, बाबा कोकाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, आरोग्य सहाय्यक आनंदा चव्हाण, स्वप्निल रेवडेकर, डॉ. अभी पाटील, आरोग्यसेविका श्रीमती कातकर व ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

जि. प. अध्यक्ष संजना सावंत व सदस्य सुधीर नकाशे यांच्या पाठपुराव्यामुळे या उपकेंद्रात लसीकरण सुरू झाले आहे. या केंद्रावर बुधवारी सकाळपासून 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. या उपकेंद्रात लसीकरण सुरू झाल्याने नाधवडेसह कोकिसरे, नापणे व इतर गावातील नागरिकांना याचा चांगला फायदा होणार आहे. लसीकरण केंद्रावर मदतीसाठी ग्रा.पं. कर्मचारी, स्थानिक संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!