आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾बाबासाहेब आंबेडकर समाजप्रबोधन समन्वय समितिचा ओटवणे, वाफोली जाधव वाडीला मदतीचा हात

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज                   

 ✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा, दि-१२ :- सध्या कोरोनाचा फैलाव जोरदार पद्धतीने होत असून रुग्ण वाढीचे प्रमाण ही दिवसेंदिवस वाढत आहे. यात ओटवणे जाधववाडी आणि वाफोली हरिजनवाडी येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळाले आहेत. याच पाश्र्वभूमीवर आंबेडकर समन्वयक समितीने मदतीचा हात देत पुढे केला आहे.

ओटवणे येथील १५ तर वाफोली हरिजनवाडी येथील २५ कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे करत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. व कोरोनाच्या काळात माणुसकी जपली आहे. यावेळी वाफोली गावचे सामजिक कार्यकर्ते विनेश गवस, ग्रामसेवक ठाकूर, समितीचे अध्यक्ष कांता जाधव, विनायक जाधव,लाडू जाधव,प्रकाश जाधव आदी सह स्थानिक प्रतिनिधी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!