आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾खाजगी रूग्णालयांना कोरोनाच्या उपचारासाठी व अन्य उपचारासाठी रूग्णालयाबाहेर रेट बोर्ड लावण्याची सक्ती करा..

 

◾ यासंदर्भात मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांचे सावंतवाडी प्रांताअधिकारी यांना निवेदन..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

 🎴सावंतवाडी, दि-१२ :- सर्वप्रथम प्रशासनाच्या वतीने कोरोना साखळी खंडित करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल आशिष सुभेदार यांनी प्रांताधिकारी सावंतवाडी यांचे मनसे शाखेतर्फे अभिनंदन केले

सर्वच ठिकाणी एकीकडे कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेदिवस वाढ होत असताना दुसरीकडे मात्र कोविड उपचारासाठीच्या विविध चाचण्यांच्या नावावर तालुक्यातील काही खाजगी रुग्णालये रुग्णांवर अवास्तव बिले आकारत असल्याच्या तक्रारी आहेत.कोविड रुग्णांना सोनोग्राफी करण्यासाठी दबाव आणला जातो.परंतु अशा कोणत्याही सोनोग्राफीची सक्ती करू नये याबत आपण रुग्णालयांना सूचना द्याव्यात. सदर बाब म्हणजे गोरगरीब सामान्य जनतेची एकप्रकारे लूट होत असल्याचा प्रकार आहे.

रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर दररोज केलेले उपचार,चाचण्या यांची फाइल,बीले देणे आवश्यक आहे.परंतु दिली जात नाही.खाजगी रूग्णालया बाहेर कोरोनाच्या उपचारासाठी व अन्य उपचारासाठी रेट बोर्ड लावण्यात यावे हा महत्वाचा निर्णय राज्य शासनाचा आहे.परंतु सावंतवाडीतील काही रुग्णालयांमध्ये अजूनही रेट बोर्ड लावण्यात आलेले नाहीत.खाजगी रुग्णालयांना रेट बोर्ड लावण्याची सक्ती करण्यात यावी असे सुभेदार यांनी प्रांताधिकाऱ्यांन निवेदनाद्वारे सांगितले.

वरील सर्व गोष्टींचा प्रांताधिकारी यांनी गांभीर्याने विचार करावा व गोरगरीब,सामान्य जनतेला कोरोनाच्या या कठीण काळात न्याय मिळवून द्यावा यासाठी हे पत्र सावंतवाडी मनसेतर्फे देत असल्याचे सुभेदार यांनी सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर युवती अध्यक्ष ललिता नाईक उपाध्यक्ष शुभम सावंत सचिव आकाश परब आदि उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!