आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

◾शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करा म्हापण सरपंच अभय ठाकुर यांचे ग्रामस्थांना आवाहन..

 

◾म्हापण मध्ये सध्या सोळा कोरोणा रूग्ण सक्रिय..

◾जीवनावश्यक सेवांमुळे होणाऱ्या गर्दीमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर..

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ला, दि-१२ :- सध्या म्हापण मध्ये वाढत असलेल्या कोरोणा रुग्ण संख्येमुळे स्तानिक प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे. कोरोणाची वाढती रुग्ण संख्या पाहून म्हापण सरपंच अभय ठाकूर यांनी ग्रामस्थांना काटेकोरपणे शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

म्हापण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आजघडीस १६ सक्रीय कोरोना रुग्ण असुन सर्व रुग्ण आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील ५० हुन अधिक लोकांचे चाचणी अहवाल अद्याप येणे असल्याने हा आकडा वाढू शकतो. मागच्या वर्षी याच काळात म्हापणमध्ये कोरोणाचे संकट फारसे गंभीर नसतानाही ग्रामस्थांनी शासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करीत होतो. मात्र आता परीस्थिती चिंताजनक असतानाही शासनाचे आदेश धाब्यावर बसवून बाजारात विनाकारण गर्दी होत आहे. जीवनावश्यक वस्तुंसाठी येणार्‍या ग्रामस्थांचा अपवाद वगळला तरी बहूतांश मंडळी क्षुल्लक कारणासाठी बाजारात येताना दिसत आहेत. पोलीस प्रशासन आपल्या परीने नियंत्रण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र नागरीकांनी स्वत:हुन संयम पाळणे गरजेचे आहे. काहीजण दररोज मेडीकल दुकानात जातो, जीवनावश्यक वाहातूक (आंबा, मासे, इ.) याचे निमित्त सांगून बाजारात येतात. तसेच भाजी किराणा ही दुकाने सुरु असताना दररोज खरेदीसाठी येत असत. त्यातच आता म्हापण बाजारपेठ नजीकच नवीन पेशंट मिळत असल्याने प्रशासनाच्या काळजीत आणखीनच भर पडली आहे. तरी “माझा म्हापण गाव, माझी जबाबदारी” हा विचार नजरेसमोर ठेवुन प्रत्येकाने शक्यतो घरीच राहून कोविड सनिंयंत्रण समिती व म्हापण ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

म्हापण ही पंचक्रोशीतील मोठी बाजारपेठ असून येथे खरेदी, व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते ही बाजारपेठ ताज्या माशांसाठी प्रसिद्ध असल्याने दूर दूरवरून लोक या ठिकाणी खरेदी साठी येतात त्यामुळेच येथे कोरोणा येथे झटपट आपले हातपाय पसरवू शकतो. त्यामूळे नागरिकांनी शासकिय नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरी राहून स्वतःचा व इतरांच्या जीवाची काळजी घेणे हाच सध्या तरी पर्याय नागरिकांकडे उपलब्ध आहे अस दिसतय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!