कणकवली शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कसुन चौकशी
◾आज कणकवली शहरात सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी भेट दिली…
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १२ आज कणकवली शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कसुन चौकशी केली जात आहे. विनाकारण कोणी फिरताना आढळुन आल्यास, पोलिस अधिकारी त्यांची कोरोना तपासणी करण्यास सांगत आहेत. प्रत्येक गाड्यांची तपासणी करून, सर्व माहिती विचारून मगच त्यांना सोडलं जात आहे.
कोरोना काळात सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी बंदोबस्तावरील आपल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरोग्य आणि महसुल पथकातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ऑन फिल्ड ड्युटी करत त्यांना प्रोत्साहन दिले आहे.
सध्या जिल्ह्यात कडक टाळेबंदीची अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभुमीवर स्वतः एस. पी. राजेंद्र दाभाडे हे आज सकाळपासुन ऑन फिल्ड आहेत. अगदी सकाळपासुन सावंतवाडी, बांदा, कुडाळ दौरा करून ११.३० च्या सुमारास एस. पी. कणकवली शहरात दाखल झाले.
कणकवली पटवर्धन चौकात थांबुन एस. पी. राजेंद्र दाभाडे यांनी तैनात आरोग्य पथकाकडे जात कामकाजाची माहिती घेतली. आरोग्य पथकात तैनात असलेल्या आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी केली. स्वतःची काळजी घ्या आणि आपले कर्तव्य बजावा, असा सल्ला देत त्यांना प्रोत्साहन दिले. स्वतः एस. पी. नी दिलेल्या भेटीने आणि आस्थेने केलेल्या चौकशीमुळे शिक्षण विभागातील आरोग्य पथकातील तैनात शिक्षक लक्ष्मण वळवी भारावुन गेले. तसेच पटवर्धन चौकात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आवश्यक सुचना देत अनावश्यक कारणासाठी कोणी बाहेर फिरताना आढळले, तर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचनाही दिल्या.
यावेळी डी. वाय. एस. पी. डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्यासह हायवे टॅबचे ए. पी. आय. अरुण जाधव उपस्थित होते.

