आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾ अखेर प्रशासनाने पर्यटन स्थळांची माहिती देणारे फलक लावले..

 

◾पर्यटन विकासासाठी एक पाऊल समृद्धीकडे..

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

 🎴सिंधुदुर्ग, दि-१२ :- सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पर्यटन स्थळांची खाणच आहे .मात्र या पर्यटन स्थळांची योग्य प्रचार व प्रसिद्धी न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे प्रकाशझोतात येण्यापासून दूरच राहिली आहेत .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांबाबतचे माहिती फलक नव्हते. मात्र शासनाला उशिरा का होईना जाग आली. व जिल्ह्यात प्रत्येक महत्वाच्या नाक्यावर व पर्यटन स्थळांची माहिती देणारे माहिती फलक चांदा ते बांदा अंतर्गत झळकले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांच्या प्रवासाच्या नकाशावर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असंख्य पर्यटन स्थळे आहेत . नयनरम्य व स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटकांना गुगल मॅपवर ही पर्यटन स्थळे दिसतात. परंतु प्रत्यक्षात प्रवास करताना पर्यटकांना ही पर्यटन स्थळे शोधावी लागतात . पर्यटन स्थळांची माहिती घेताना भाषेचा अडथळा येतो. यामुळे अनेक पर्यटक पर्यटन स्थळा पर्यंत जाणे टाळतात . त्यामुळे जिल्हा पर्यटन जिल्हा असूनही पर्यटकांना वीना बर्‍याचवेळा सुनासुनाच असतो. जिल्ह्यातील प्रत्येक नाक्यावर आता पर्यटन स्थळांची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विभाग चांदा ते बांदा एक पाऊल समृद्धीकडे असे लिहून यावर पर्यटन स्थळे तालुक्यातील त्या मार्गावरील महत्त्वाचे ठिकाणे यांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता पर्यटनस्थळे पर्यटकांना पाहण्यासाठी सोईची झाली आहेत मात्र त्या फलकावर किलोमीटरचा उल्लेख केला असता तर अधिक सोयीचे झाले असते असे मत नागरिकांकडून व वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!