◾भंगसाळ नदीवरील पाणी चिपीला जाणार्या पाईप लाईनचे काम रोखा..
◾कुडाळ मधील भाजप पदाधिकार्यांची मागणी ; बाधीत ग्रामस्थांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप..
◾कुडाळ भंगसाळ नदी चे पाणी चिपी विमानतळ येथे नेण्यासाठी टाकत असलेल्यापाण्याच्या पाईप लाईनच्या कामास स्थगिती देणे बाबत..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ, दि-११ :- कुडाळ येथीलभंगसाळ नदीचे पाणी चिपी विमानतळाला नेण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे कामाला त्वरित स्थगिती द्यावी तसेच संबंधित बाधित गावच्या ग्रामस्थांची बैठक घेऊन रास्त निर्णय घ्यावा अशी मागणी कुडाळ चे नगर सेवक राकेश कांदे आणि त्यांच्यासहकाऱ्यांनी एम आय डी सी उप अभियंता विभागाच्या उप अभियंत्याकडे केली आहे.. नुकताच भगंसाळी नदी येथे पाण्याची साठवण करण्यासाठी बंधारा बांधण्यात आला. सदरचे काम कित्येक दिवस रखडत रखडत चालू होते सद्यस्थिती त्या बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे.बंधारा लिकेज असल्याचे दिसून येते यावरून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतो. तसेच नदीपात्रात पाण्याची पातळी ही खालावलेली दिसते .भंगसाळ नदीच्या पाण्यावर कुडाळ शहराची मोठी लोकसंख्या तसेच पावशी, आंबडपाल ,मुळदे तसेच इतर लगतची गावे व तेथील लोक शेतकरी बांधव या पाण्यावर अवलंबून आहेत मे अखेरीस पाणी नसल्याने सदरच्या भागातील विहिरी ही कोरड्या पडतात तर पाण्याची पातळी खालावली जाते पाणी ही बाब अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने भवीष्यात विचार करता मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते .त्यामुळे भरपूर पाणीसाठ्याची सदर गावातील लोकांना नितांत गरज आहे . तरी आपल्या विभागामार्फत स्थानिक प्राधिकरण तसेच ग्रामस्थांशी व संबंधित गावातील प्रतिनिधींची बैठक घेण्यात यावी , तसेच नदीपात्रात कुडाळ शहरातील साचणारे पूर्व पारंपार नाल्यातून जाणारे सांडपाणी जाते .जोपर्यंत स्लॅब ड्रेन चे काम पूर्णत्वास जात नाही .तोपर्यंत सदर नदीपात्रात साचलेले दूषित पाणी विमानतळाला देणे योग्य ठरणार नाही.हे आरोग्य आणि जिवीताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे संबंधित लगत च्या सर्व गावातील ग्रामस्थांची आपल्या विभागामार्फत जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत विमानतळास भंगसाळ नदीपात्रातून पाणी देण्यासाठी आपल्या विभागामार्फत चालू असलेल्या कामाला आपण त्वरित स्थगिती द्यावी.निवेदन देताना खालील पदाधिकारी उपस्थितहोते.
शहराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कांदे, सोबत ओबीसी जिल्हाध्यक्ष सौ. दीपलक्ष्मी पडते, माजी उपनगराध्यक्ष श्री. अनंत धडाम, नगरसेवक सुनील बांदेकर ,महिला शहराध्यक्ष सौ.ममता धुरी , शक्ती केंद्र प्रमुख राकेश नेमळेकर उपस्थित होते.

