आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾शिवभोजन योजनांची केंद्र महिलांना चालवण्यास द्या

 

◾विभावरी सुकी : महिला प्रदेश काँग्रेस कडून मार्गदर्शन..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-११ :- महाविकास आघाडी सरकार कडून सुरू करण्यात आलेली शिवभोजन योजनांची केंद्र महिलांना चालवण्यास दिली जावीत अशी मागणी महिला प्रदेश काँग्रेस च्या वतीने सरकार कडे करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी ग्रामीण स्तरावर व्हावी तसेच लाॅकडाऊन काळात महिलांना स्वयंरोजगार उभारण्यास मदत करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून याची माहीती महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी ऑनलाईन बैठकीत दिली यावेळी प्रदेश काँग्रेस च्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यानी ही मार्गदर्शन केल्याची माहिती महिला प्रदेश काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी विभावरी सुकी यानी दिली.

या ऑनलाईन बैठकीत एक घास मदतीचा असा महिला काँग्रेस कडून स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून यातून गरजू लोकांना पोटभर जेवण तसेच जनसेवा घडून येईल असा या उपक्रमाचा हेतू असून

या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.

आपणास कोरोना काळात अनेक नवनवीन उपक्रम राबवावेत यात घरेलू कामगार असूदे किंवा महिलांना लसीकरण केंद्र चालवण्यास देणे कोरोना काळात गरीब लोकांना धान्य मिळाले पाहिजे महिला स्वयंरोजगार दिला गेला पाहिजे असे अनेक मुद्दे या बैठकीत चर्चेला आले यावेळी प्रदेशाध्यक्ष व महिला प्रदेश कार्याध्यक्षा यांनी मार्गदर्शन केले.यात प्रामुख्याने शिवभोजन थाळी ही योजना महाविकास आघाडी सरकारचा एक प्रभावशाली उपक्रम असून हे केंद्र महिलांना चालवण्यास देण्यात यावीत अशी मागणी सरकार कडे करण्यात आली असल्याचे सुकी यांनी सागितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!