आणखीकोकणक्राइममहाराष्ट्ररत्नागिरी

◼️मार्गताम्हणेत गावठी हातभट्टीवर धाड ; लाखोंचा मुद्देमाल जप्त ; तिघांना अटक, भट्टयाही केल्या उद्धवस्त

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-११ :- तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील गावठी हातभट्टीवर स्थानिक गुन्हा अनवेश पथकाने छापा टाकत सुमारे १ लाख ८५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. तर हातभट्ट्याना थेट आग लावून उद्धवस्त करण्यात आले आहेत. काल ही कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे बेकायदा गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला प्राप्त झाली होती. माहितीची सत्यता पडताळल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी संबंधित ठिकाणी थेट छापा टाकून कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत तब्बल १ लाख ८५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून सुधीर घाणेकर, संदीप घाणेकर आणि गणेश घारे (सर्व मार्गताम्हाणे) या तिघांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच हातभट्टीचे सर्व साहित्य जागेवरच आग लावून उद्धवस्त करण्यात आले.

चिपळूण तालुक्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली असून स्थानिक गुन्हा अनवेश पथकाने थेट ही कारवाई केल्याने बेकायदा गावठी हातभट्टी दारूवाल्यांचे धाबेच दणाणले आहेत. मार्गताम्हानेत यापूर्वी देखील उत्पादन शुल्क विभागाने अशीच मोठी कारवाई केली होती. तसेच चिपळूण वालोपे येथे देखील काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती.मार्गताम्हाणे येथील गावठी हातभट्टीवर छापा टाकत पोलिसांनी त्या उद्धवस्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!