आणखीआरोग्यमहाराष्ट्रमुंबई

◾शिवडी विधानसभा क्षेत्रातील नवीन लसीकरण केंद्राची शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केली पहाणी..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई,दि.११ :- शिवडी विधानसभा क्षेत्रातील नवीन लसीकरण केंद्राची शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी पहाणी केली. आज सहा लसीकरण केंद्रावर भेट दिली. त्यामध्ये कल्पतरु अव्हाना वाहन स्थळ, साई बाबा पंथ, वेटणरी सभागृह ( ग. द. आंबेकर मार्ग ), सेलिस्टीया वाहन स्थळ ( टी. जे. रोड, शिवडी ), अभुदयनगर शाळा ( काळाचौकी ), प्रबोधनकार ठाकरे मैदान ( शिवडी ) या लसीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली. त्यांच्या सोबत मुंबई महानगरपालिका अधिकारी बालमवार, सहाय्यक आयुक्त बेळारे, नगरसेवक अनील कोकीळ, नगरसेवक दत्ता पोगडे, नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेविका श्रद्धा जाधव, तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!