◾आरोस गावात सॅनिटायझर फवारणी ; प्राणजीवन सहयोग संस्थेचा उपक्रम
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस
🎴बांदा, दि-११ :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोस ग्रामपंचायत परिक्षेत्रात प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल-कणकवली यांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी व रुग्ण असलेल्या ठिकाणी मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.
यावेळी मनसे विभाग अध्यक्ष मंदार नाईक, ग्रा.पं. सदस्या मनीषा परब, शिवसेना माजी विभागप्रमुख गुरुनाथ नाईक, प्राणिजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर, सावंतवाडी प्रतिनिधी निखिल आजगावकर, वेंगुर्लेचे नितेश शेणई, सहकारी मोहन गवस, विनायक प्रभूझाट्ये, विश्राम कोचरेकर, राजन गावडे, सीताराम नाईक व श्रीराम जाधव तसेच आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, आनंद परब, शिवसेना शाखाप्रमुख राजन परब, उपशाखाप्रमुख गुरुनाथ नाईक, माजी उपसरपंच गजानन परब, पोलीस पाटील महेश आरोसकर, बंड्या आरोसकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
माऊली मंदिरापासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी, रेशन दुकाने, मंदिर व ज्या भागात कोरोना रुग्ण आढळून आले त्या परिक्षेत्रात फवारणी करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांकडून प्राणजीवन सहयोग संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

