◾वैभववाडी शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई..
◾कारवाईस सुरुवात केल्याने आपोआप शहरातील वर्दळ थांबली..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनीधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-११ :- वैभववाडी शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात कडक कारवाईस सुरुवात केल्याने आपोआप शहरातील वर्दळ थांबली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी कडक लाँकडाऊनचे आदेश दिले आहेत. मंगळवारी विनाकारण शहरात फिरणाऱ्या वाहन चालकांचा पोलिसांनी समाचार घेतला. यावेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव व वाहतूक पोलीस राठोड,आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
मंगळवारी वैभववाडी संभाजी चौकात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
त्यामुळे चौकात वाहानाची गर्दी झाली होती. विनाकारण बाहेर फिरू नये, अन्यथा कारवाई करणार असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

