आणखीकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

◾अखेर उंबर्डे भुतेश्वर वाडी व रमदुलार वाडी मधील पाण्याच्या प्रश्न मिटला

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके                                  

🎴वैभववाडी, दि-११ :- उंबर्डे भुतेश्वर वाडी नळयोजना रमदुलार वाडी विहिरीवरून राबविण्यात आली होती एकाच विहिरीवरून दोन मोठ्या वाड्यांना स्वतंत्र योजना राबविल्यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये दर वर्षी भूतेश्वर वाडीला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते पाण्यासाठी वणवण करावी लागत होती सदर बाब सरपंच एस एम बोबडे यांनी आमदार नितेशजी राणे साहेबांच्या निदर्शनास आणून देताच राणे साहेबांनी सदर विहिरीचे भूमिपूजन केले होते आमदार साहेबांच्या प्रयत्नाने योजनेचे काम पूर्ण होऊन आज वैभववाडी तालुका बीजेपी अध्यक्ष श्री नासीर काझी यांच्या हस्ते उद्घाटन करून योजना कार्यान्वित करण्यात आली सदर विहीर ही तालुक्यातील सर्वात मोठी विहीर असून मे महिन्यामध्ये सदर विहिरीला 30 ते 35 फूट पाणी आहे त्यामुळे भूतेश्वर वाडी ,पाटील वाडी, सुतार वाडी ,गुरव वाडी यांची पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी दूर झाली आहे त्यामुळे भूतेश्वर वाडी तील लोकांनी आमदार नितेश राणे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी उद्घाटन कार्यक्रमलाउंबर्डे सरपंच एस एम बोबडे,उपसरपंच दशरथ दळवी, बीजेपी युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, माजीपोलीस पाटील रामजी दळवी ,अशोक दळवी, विठ्ठल सावंत ,वासुदेव पावसकर, ग्रा प सदस्य मंगेश कदम ,उदय मुद्रस ,चंद्रकांत मुद्रस ,गुरुनाथ शिवगण ,बळीराम दळवी ,शैलेश दळवी ,जितेंद्र रामानेसुप्रसाद पांचाळ इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!