आणखीमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

◾अत्यंत दुःखद बातमी जि. प. सदस्य सुनील म्हापणकर यांचे कोरोणाने निधन..

 

◾अत्यंत तडफदार, जिगरबाज नेता हरवला..

◾परुळे पंचक्रोशीवर पसरली शोककळा..

🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ला, दि-१० :- जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य व शिक्षण आणि स्थायी समिती सदस्य शिवसेना नेते श्री सुनील वसंत म्हापणकर यांचे आज सायंकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने संपुर्ण परुळे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

साधारण एक तीन दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्यात आले होते. आयुष्यात त्यांनी अनेक कठीण लढाया लढल्या व जिंकल्याही पण कोरोणा विरुद्धच्या लढ्यात मात्र ते अपयशी ठरले व आपल्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना ते पोरक करून गेले.

कोरोणा काळात त्यांनी विविध मार्गांनी समाजसेवेचे कार्य पार पाडले. खेळाडू, कलाकार, गुणवान विद्यार्थी व तरूणांच्या पाठीशी ते नेहमीच उभे राहायचे एक धाडसी, तडफदार, जिगरबाज, मितभाषी,बिनधास्त व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. एखाद काम त्यांनी हातात घेतले तर ते पुर्ण होणारच असा विश्वास लोकांना त्यांच्या विषयी होता. गेले कित्येक वर्षे ते समाजकारण, राजकारण यात सक्रिय होते त्यांच्या अकाली निधनाने संपुर्ण परुळे व म्हापण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

त्यांचा धीरगंभीर चेहरा सदैव सर्वांच्या स्मरणात राहील त्यांच्या अवेळी जाण्याने परुळे पंचक्रोशीने एक मोठा नेता गमावला आहे त्याच्या जाण्याने पंचक्रोशीच्या राजकिय पटलावर जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढणे केवळ अशक्य आहे.

अशा या राजामाणसाला कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!