आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

◼️चिपळूण युवासेनेच्या रक्तदान शिबिराला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि-१० :- कोरोना काळात रक्ताचा भासणारा तुटवडा पाहता युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेल्या अहवानानुसार चिपळूण तालुका युवासेनेने चिपळूण शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.विशेषतः ६५ तरुण तरुणींनी स्वयंफुर्तीने शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले.

कोरोना महामारीच्या कठीण कल सुरू आहे.आशा परिस्थितीत रक्ताची मागणी देखील वाढत आहे.आगामी काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्री यांनी वेळोवेळो रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.तर युवसेनाप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या युवासेना सैनिकांना जास्तीतजास्त रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.पक्ष पातळीवर तसा कार्यक्रम देखील त्यांनी जाहीर केला होता.

युवासेना प्रमुखांचे आदेश येताच चिवळून तालुका युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते शहरप्रमुख निहार कोवले आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत चिपळूण शहरातील बांदल हायस्कुल सभागृहात सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या सदर शिबीराला *आमदार भास्कर जाधव,जी.प अध्यक्ष विक्रांत जाधव,विधासभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम,तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे,राजू देवळेकर,शहरप्रमुख उमेश सकपाळ महिला संघटक सुप्रिया सुर्वे, मा उपजिल्हा प्रमुख राजू भागवत,माजी नगरसेवक संजय रेडीज उपशहरप्रमुख भय्या कदम*आदीनी भेट दिली.

या शिबिरात तरुण तरुणींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून *६५ युवक युवतींनी येथे रक्तदान केले.रक्तदान शिबिराला रक्तपेढी तसेच सर्व यंत्रणा पुरवण्यासाठी विक्रांत जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.या रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच *शिबिर यशस्वी होण्यासाठी तालुकाप्रमुख उमेश खताते,शहरप्रमुख निहार कोळे यांच्यासह तालुका सचिव प्रतिक शिंदे,शहर अधिकरी विधानसभा आयटीसेल अधिकारी विशाल ओसावाल,उपतालुका अधिकारी अवधूत शिर्के,दिपक मोरे,महेश शिंदे,ऋषिकेश नलावडे,युवतीसेना उपतालुका अधिकारी शिवानी कासार,साहिल शिर्के,उपशहर अधिकारी प्रार्थ जागुष्टे,विनोद पिल्ले,आयटीसेल विभाग अधिकारी सौरभ कदम,विनीत शिंदे,ओमंकार गायकवाड,मनिष शिर्के,देवेंद्र शिंदे,संकेत नलावडे,मुबारक सकवारे,अजिक्य पवार,अमय चितले,निलेश आवले,शिवानि शिंदे,सुप्रदा दळवी,प्रसाद कोलगे,राहुल भोसले यांनी मेहनत घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!