◾सुप्रिया केमिकल्सच्या भरीव योगदानातून लोटे भागात दोन कोविड सेंटरचे आ. भास्करराव जाधव यांच्या हस्ते उदघाटन..
◾६० सुसज्ज बेडची व्यवस्था ; स्थानिक रुग्णांना मिळणार दिलासा
◾बर्निंग हॉस्पिटसाठी प्रयत्न..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण, दि-१० :- परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घाणेखुंट येथे आणि हॉटेल वक्रतुंड येथे डॉ.परशुराम गौड यांच्या एस एम एस हॉस्पिटलच्या सहयोगाने लोटे औद्योगिक क्षेत्रातील सुप्रिया लाईफसायन्स कंपनीचे मालक सतीश वाघ यांच्या भरीव योगदानातून उभे राहिलेल्या दोन सुसज्ज असे कोविड सेंटरचे उदघाटन गुहागर-खेड-चिपळूण मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते आज सोमवार दिनांक १० मे रोजी झाले आहे.ही कोविड सेंटर सुरू होण्यामध्ये असलेल्या अडचणी व त्रुटींवर जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाशी बोलून आ.जाधव यांनी मार्ग काढला आणि आज ती सुरू करण्यात आली.
ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह सुसज्ज असलेल्या या कोविड सेंटरचा खूप मोठा फायदा लोटे विभागातील रुग्णांना होणार आहे.ही दोन्ही कोविड सेंटर प्रत्येकी ३० बेडची आहेत.
परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात आमदार जाधव यांनी ही जागतिक महामारी असून प्रत्येकाने स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. त्याचवेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजेंद्र आंब्रे यांनी बर्निंग हॉस्पिटलची केलेली मागणी योग्य असून त्यासाठीही पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी सीईटीपी अध्यक्ष सतीश वाघ, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संचालक शामसुंदर भाकरे, सुप्रिया लाईफसायन्स कंपनीचे वैद्य, जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती सुनील मोरे, राजेंद्र आंब्रे,जि प सदस्य अरविंद चव्हाण, घाणेखुंटचे सरपंच अंकुश काते, लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके, मोहन आंब्रे, आल्हाद वरवाटकर आदी उपस्थित होते.

