आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

◾वैभववाडी तालुक्यातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेला दिगशी गाव आज झाला कोरोना मुक्त..

 

◾जिल्ह्यातील तरुणांनी कोरोना बाधित रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे यावे ; स्वप्नील धुरी

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-१० :- वैभववाडी तालुक्यातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेला दिगशी गाव आज कोरोना मुक्त झाला आहे. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासन यांनी मेहनत घेतलीच परंतु मागील एक महिन्यापासून दिगशी गावचे रहिवासी असणारे, युवासेनेचे जिल्हा चिटणीस श्री. स्वप्नील धुरी यांनी जी मेहनत घेतली आहे त्यामुळेच आज दिगशी गाव कोरोना मुक्त झाला आहे, गावात कोरोना ची लक्षणे असणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्वप्नील धुरी यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी गावचे सरपंच/ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून कोरोनाची लक्षणे असणाऱ्या लोकांची दिगशी गावातच कोरोना तपासणी करण्यासाठी कॅम्प लावावा अस अयोग्य यंत्रणेला सांगितले व गावात तपासणी करण्यास सुरुवात झाली. गावातील लोक घाबरली होती , बरिचशी लोकं तपासणी साठी घराबाहेर येत नव्हती. प्रत्येक घरात स्वतः जाऊन लोकांना समजवण्याचं काम स्वप्नील धुरी यांनी केलं, गावात एकूण चार ते पाच दिवस कॅम्प घेण्यात आले, लक्षणे असण्याऱ्या जवळपास 190 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यातील 100 पेक्षा अधिक लोकं कोरोना बाधित निघाली.कोरोना बाधीत असलेल्या श्वास घेण्यास जास्त त्रास होत असलेल्या 9 रुग्णांना स्वप्नील धुरी यांनी स्वतःच्या गाडीने जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल केले, काहींना वैभववाडी येथील सांगूळवाडी कोविड सेंटर ला दाखल केले.

गावात वाढत चाललेला कोरोनाचा प्रसार बघून गावात सॅनिटायझर फवारणी करण्यासाठी कोणी तयार होत नव्हते अशावेळी स्वतः सहकाऱ्यांना सोबत घेऊन संपूर्ण गावात घराघरात सॅनिटायझर ची फवारणी करून घेतली. रुग्णांना दाखल करण्यापासून ते त्यांना सोडल्या नंतर घरी आणण्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी स्वप्नील धुरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली. या काळात दिगशी गाव कंटेंटमेंट झोन करण्यात आला होता , यावेळी गावातील लोकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचं काम सुद्धा स्वप्नील धुरी आणि त्यांच्या टीम ने प्रामाणिक पणे केलं. एवढ्यावरच न थांबता कोरोना मुळे मृत्यू झालेला 4 रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी ही त्यांनी पार पाडली.

या सगळ्यात स्वप्नील धुरी यांच्या सोबत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील ,सागर पवार, राजेश पवार, नरेंद्र धुरी, देवेंद्र पाष्टे,दत्ताराम धुरी,राहुल धुरी,रमाकांत धुरी,महेश चाळके यांसह इतर त्यांचे सहकारी खांद्याला खांदा लावून जीवाची पर्वा न करता काम करत होते.

यावेळी स्वप्नील धुरी यांच्याशी बोलताना म्हणाले, आज माझा गाव कोरोना मुक्त झाला आहे हे ऐकून खूप बर वाटल , आम्ही जीवाची पर्वा न करता जे काम केलं त्याची पोचपावती आज मिळाली .

माझ्या गावावर आलेलं हे संकट खूप भयानक होत, यातून माझी सर्व लोकं सुखरूप बाहेर पडावीत एवढंच मनात होत. आज आमच्यामुळे कित्येक जीव वाचले आहेत याच समाधान आहे, आरोग्य यंत्रणेच्या खासकरून उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्री. करण पाटील व त्यांची सर्व टीम त्यांचा तत्परतेमुळे आणि योग्य नियोजना मुळे आज माझा गाव कोरोना मुक्त होतोय. या काळात डॉ. अनिल पवार, डॉ. सोनवणे, डॉ. धर्मे,वैभववाडी पोलीस निरीक्षक – अतुल जाधव , तहसीलदार – रामदास झळके यांचं उत्तम सहकार्य लाभले. कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार श्री.वैभव नाईकसाहेब यांनी आमची दखल घेऊन गावात आले आणि यंत्रणेला योग्य त्या सूचना केल्या तसेच आमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले, त्याच बरोबर जिल्हा बँकेचे अध्यक्ष – सतीश सावंत ,तालुका प्रमुख- मंगेश लोके, पंढरी तावडे यांनी जे सहकार्य केले त्या बद्दल सर्वांचे आभार मानले.

वैभववाडी तालुक्यात, तसेच जिल्ह्यातील तरुणांनी कोरोना बाधित रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे यावे असे आव्हान स्वप्नील धुरी यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!