आणखीकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

◾वैभववाडी नगरपंचायत विकासकामांसाठी निधी मंजूर..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

 ✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-१० :- वाभवे- वैभववाडी नगरपंचायत विकासकामांसाठी खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने २९ लाखांचा निधीची आवश्यकता होती त्यासाठी शिवसेना तालूका प्रमुख मंगेश लोके व नगरपंचायतचे शिवसेनेचे माजी नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी यांनी लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांच्याकडे वाभवे- वैभववाडी नगरपंचायतसाठी

निधी मिळावा यासाठी मागणी केली होती. त्या मागणीला यश आले आहे. असी माहिती तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी दिली.

खासदार राऊत यांनी नगरपंचायत क्षेत्रातील विसकामांसाठी राज्याचे नगरविकासमंत्री नाम. एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेतला व ही कामे मार्गी लावली त्याबद्दल वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीचे सर्व माजी नगरसेवक, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, शहरप्रमुख प्रदीप रावराणे तसेच तालुक्यातील व वाभवे-वैभववाडी क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांचे वतीने लोकसभा गटनेते शिवसेना खासदार विनायक राऊत यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!