◾मडूरा पंचक्रोशीत सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर फवारणी..
◾प्राणजीवन सहयोग संस्थेचा उपक्रम..
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस
🎴बांदा, दि-१० :- सोसायटी फॉर इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट व प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल – कणकवली यांच्या माध्यमातून मडूरा दशक्रोशीतील सार्वजनिक ठिकाणी मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. मडूरा तिठा येथून रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मडूरा सरपंच साक्षी तोरसकर, उपसरपंच विजय वालावलकर, निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे, पाडलोस उपसरपंच महादेव गावडे, माजी उपसरपंच विजय कुडतरकर, मडूरा पोलीस पाटील नितीन नाईक, पाडलोस पोलीस पाटील सौ. रश्मी माधव, सुभाष करमळकर, विलास पावसकर, यशवंत माधव, सोमनाथ तोरसकर, श्रीराम जाधव, सिद्धेश सावळ, नाना वेंगुर्लेकर, डॉ. बर्वे, संस्थेचे अध्यक्ष संदिप चौकेकर, अंकित आजगावकर, रितेश शेणई, विनायक प्रभुझांट्ये, विश्राम कोचरेकर, मोहन गवस, अक्षय कशाळीकर, राजन गावडे, सिताराम नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरणे टाळावे. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा असे आवाहन केले. सुत्रसंचलन व आभार नितीन नाईक यांनी मानले. मडूरा, निगुडे, रोणापाल, शेर्ले, कास व पाडलोस गावात सार्वजनिक ठिकाणी व स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार खासगी ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांकडून प्राणजीवन सहयोग संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

