आपत्कालीनआरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

तळवडे येथील चिमुकलीच्या उपचारासाठी मदतीची गरज

 

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :प्रथमेश गावडे

*🎴सावंतवाडी दि.१०मे:* तालुक्यातील तळवडे येथील आणि सध्या मुंबईस्थित कु रिया निलेश सावंत या सात वर्षाच्या चिमुरडीला मेंदूचा मेडुलॉब्लास्टोमा कॅन्सर झाला आहे. सुमारे आठ लाख खर्च करून तिचे ऑपरेशनही झाले आहे. मात्र चेन्नई येथे होणाऱ्या पुढील इंटेनसिटी मोडूलेटेड प्रोटॉन थेरपीसाठी सुमारे ३५ लाख खर्च आहे.

कु रियाचे वडील मुंबईत निलकमल कंपनीत कामाला आहे. त्यांच्या पगारातुन कुटुंबाचा खर्च भागतो. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. रियाच्या कॅन्सर ऑपरेशनच्या खर्चाच्या पाठोपाठ प्रोटॉन थेरपीचा खर्च ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रीयाच्या आतापर्यंतच्या उपचारासाठी त्यांनी आपल्याकडील होते नव्हते ते सर्व संपवले आहे. त्यामुळे समाजातील स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास तिच्यावर पुढील उपचार होणार आहे.

गेल्या मार्च महिन्यात रियाला अचानक डोकेदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागल्यानंतर उपचारादरम्यान तिला मेंदूचा मेडुलॉब्लास्टोमा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि तिच्या आई वडिलांना धक्काच बसला. रियाच्या कॅन्सरच्या शस्त्र क्रियेवरील खर्च त्यांना परवडणारा नव्हता. तरीही स्वतः कडची सर्व मिळकत गोळा करून व मित्र परीवारच्या सहकार्याने आठ लाख खर्च करून एप्रिल महिन्यात मुलुंड येथील फोरटीज हॉस्पिटलमध्ये रियाचे कॅन्सरचे ऑपरेशन करण्यात आले. मात्र पुढील इंटेनसिटी मोडूलेटेड प्रोटॉन थेरपीची सुविधा मुंबईत नसल्याने त्यासाठी तिला चेन्नई येथील अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर येथे न्यावे लागणार आहे. या प्रोटॉन थेरपीसाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च आहे. हाती पैसाच नसल्याने रिया इंटेनसिटी मोडूलेटेड प्रोटॉन थेरपीच्या प्रतीक्षेत होती. त्यामुळे या थेरपी उपचारावरील खर्चासाठी पारपोली गावचे मुंबईस्थित सेवाभावी व्यक्तिमत्त्व गोपाळ गावकर यांच्यासह काही सेवाभावी व्यक्ती व सावंत यांच्या मित्र व नातेवाईक यांनी पुढाकार घेवून काही रक्कम गोळा केली आहे. मात्र रियावरील प्रोटॉन थेरपीसाठी लागणार खर्च पाहता ती कमीच आहे. तरीही या जमलेल्या रकमेतुन जे उपचार होतील त्यासाठी रियाला सोमवारी चेन्नई येथे नेण्यात येणार आहे. यापुढे आवश्यक रक्कम जमा झाल्यास रियावर पूर्ण प्रोटॉन थेरपी होणार आहे. त्यानंतरच रिया या आजारातून पूर्ण बरी होणार आहे. त्यामुळे समाजातील सर्व दात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील बँक खात्यावर मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यासाठी खालील बँक खात्यावर मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निलेश रमेश सावंत बँक आयसीआयसीआय खाते क्र 001101542436
आयएफएससी कोड ICIC0000011

 

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!