सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे ते १५ मेपर्यंत लॉकडाऊन लागु…
◾कणकवली शहर आणि तालुक्यात १४ मेपासुन लॉकडाऊनला शिथिलता भेटण्याची शक्यता…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०८ सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊन लागु करण्यात आले तरी, त्याची प्रभावी अंमलबजावणी कणकवलीतील जनता आणि व्यापाऱ्यांनी अगोदर ८ दिवसांपासुनच जनता कर्फ्युच्या माध्यमातुन केली आहे. त्यामुळे कणकवलीला या लॉकडाऊनमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, विरोधी नगरसेवक आणि व्यापाऱ्यांनी पालकमंत्री, तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्ह्यासाठी एकाच वेळी लॉकडाऊन जाहीर झाले तरी, कणकवलीने यापुर्वी ८ दिवसांपासुन प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे आणि कणकवलीतील व्यापारी, जनतेकरिता दिलासा म्हणुन कणकवलीत १४ मेपासुन लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे आणि विरोधी गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर यांच्याशी बोलताना दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊन होणार ही बातमी आज सकाळी सर्वप्रथम ‘कोकण नाऊ’च्या माध्यमातुन दिल्यानंतर, याबाबत कणकवलीमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याबाबत तातडीने आज दुपारी बैठक घेत विरोधी नगरसेवक आणि व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडु हर्णे, कणकवली मुख्याधिकारी अवधुत तावडे, विरोधी गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा पदाधिकारी महेश नर्वेकर, राजु गवाणकर, राजेश पारकर, सुशील पारकर, राजेश राजाध्यक्ष, शेखर गणपत्ये, विशाल कामत आदी उपस्थित होते.
या बैठकीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा लॉकडाउन करत असल्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी कणकवलीबाबत चर्चा करण्यात आली. त्यांना कणकवलीत यापुर्वीच जनता कर्फ्युच्या माध्यमातुन बंद असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांचे देखील याबाबत लक्ष वेधण्यात आले असे संगितले. मात्र, यावर नगरसेवक कन्हैया पारकर यांनी कणकवली तालुक्याने यापुर्वीपासुनच लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्याने कणकवली शहरासह तालुक्याला यातुन वगळा आणि तालुक्याच्या सीमा लॉक करा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करूया असे सांगितले.
प्रशासनाच्या माध्यमातुन जे लॉकडाऊन आता जाहीर करण्यात येणार, त्याची अंमलबजावणी कणकवलीने अगोदरच केली. यासंदर्भात तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना पत्र द्या, अशी मागणी कन्हैया पारकर यांनी केली. राजेश राज्याध्यक्ष यांनी नगरपंचायतमार्फत आवाहन केल्यानंतर आम्ही कोरोनाची स्थिती आटोक्यात येण्यासाठी सहकार्याची भुमिका घेत जनता कर्फ्युमध्ये सहभागी झालो. आता प्रशासनाचं लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने जर लॉकडाऊन जाहीर केलं आणि त्यानंतर पुन्हा केंद्र सरकार मार्फत लॉकडाऊन जाहीर झालं, तर व्यापाऱ्यांनी करायचे काय? असा सवाल त्यांनी केला.
या संदर्भात पालकमंत्री सर्व आमदार यांच्याशी व्यापारी संघटनेने चर्चा करा, अशी सुचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. तर याबाबत सुशांत नाईक यांनी तातडीने आमदार वैभव नाईक यांची याप्रश्नी लक्ष वेधत व्यापाऱ्यांची भुमिका मांडली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांच्याशी चर्चा करत व्यापार्यांच्या प्रश्नांबाबत लक्ष वेधले. त्यानंतर तातडीने या संदर्भात दोन्ही आमदारांच्या माध्यमातुन पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी थेट नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून व्यापाऱ्यांची भुमिका जाणुन घेतली. त्यावर पालकमंत्री सामंत यांनी जिल्ह्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार, मात्र कणकवलीने जे अगोदर ८ दिवस लॉकडाऊन पाळलं. त्यामुळे कणकवलीतील दुकानदार आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी १३ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये सहभागी व्हा. १४ मे पासुन लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सामंत यांनी नलावडे यांना दिली.
मात्र, यावर राजन पारकर यांनी नगराध्यक्षांशी चर्चा करताना कणकवलीने अगोदर ८ दिवस कडक जनता कर्फ्यु पाळला असल्याने, निदान १३ मे रोजी पासुन दुकाने सुरू करण्यास मान्यता द्या, अशी मागणी केली. यावर कन्हैया पारकर यांनी आपण सर्वांनी एकत्र येत एक ठाम भुमिका घेऊ आणि यासाठी प्रशासनावर दबाव आणुया, अशी सुचना केली.
मात्र, जर लॉकडाऊनचे पालन केले नाही आणि कारवाई झाली, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल व्यापाऱ्यांनी करत अखेर १४ मेपासुन लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या मागणीवर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले. तसा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांना सांगण्यात आला आहे.

