◾कसाल येथे कुडाळ तहसिलदारांची धडक कारवाई..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल, दि-०७ :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ तालुक्यात 7 मे ते 15 मे पर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. राज्यात करोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध जाहीर केले आहेत. मात्र आता जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन संपूर्ण कुडाळ तालुक्यात 7 मे ते 15 मे कालावधी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या निर्णयाचे कुडाळ तहसीलदार अमोल फाटक तसेच व्यापारी संघटना राजकीय पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. मात्र शुक्रवारी सकाळी कसाल बाजारपेठ येथे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांवर कुडाळ तहसीलदार अमोल फाटक, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण धडक कारवाई केली एकूण ७ जणांवर कारवाई करत १७०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. महसूल, पोलिस ,ग्रामपंचायत प्रशासनाने, कारवाई केली. यावेळी कुडाळ तहसीलदार अमोल फाटक, कुडाळा गटविकास अधिकारी विजय चव्हाण, कसाल मंडळ अधिकारी संतोष गुरके कसाल उपसरपंच दत्ताराम सावंत, कसाल ग्राम विकास अधिकारी एस बी कोकरे , ओरोस पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यादव कसाल पोलीस पाटील अनंत कदम कसाल तलाठी संतोष बांदेकर आदींनी ही कारवाई केली
यापुढे कसाल येथे अशी अचानक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.

