लस घेण्यासाठी येणाऱ्याची मोठी गैरसोय झाली दूर
*🎴सावंतवाडी दि.०७-:* येथील उपजिल्हा रुग्णालयात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसह ४५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांनाही लसीकरण करण्यात येत आहे. लसीचा पहिला डोस या ठिकाणी दिला जातो सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत नागरिकांना भर उन्हात थांबव लागते, नागरिकांची मोठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी स्वखर्चातून मंडप उभारत त्यांची सोय केली.
यामुळे लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हापासून होणारा त्रास कमी होणार आहे तसेच लसीकरणाचे टोकन नंबर लस घेणाऱ्या लोकांना व्यवस्थित ऐकण्यास येत नव्हता त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी होत होती हे लक्षात घेऊन टोकन नंबर जाहीर करण्यासाठी स्पीकरची व्यवस्था केल्यानं लसीकरण करण्यास सोयीस्कर ठरणार आहे. या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग देखील राखलं जाणार आहे.याबाबत रुपेश राऊळ यांचे अनेकांनी लक्ष वेधले त्वरित रुपेश राऊळ यांनी वस्तुस्थितीची पाहणी करुन सोय केली. नागरिकांना उन्हाच्या झळा सहन करत उभे राहावे लागत होते मात्र शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केलेल्या सोयीबद्दल लोकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

