◾कोंडूरे सरपंच हेमंत मराठे व प्राणजीवन सहयोग संस्था शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सॅनिटायझर फवारणी उपक्रमाचा करण्यात आला आज शुभारंभ.
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-०७ -: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे व प्राणजीवन सहयोग संस्था शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सॅनिटायझर फवारणी उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून दक्षता म्हणून मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात सॅनिटायझर जंतुनाशक फवारणीला सुरुवात करण्यात आली.ही फवारणी प्राणजीवन सहयोग संस्था कणकवली शिरवल व मळेवाड कोंडुरे सरपंच हेमंत मराठे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत असून ही फवारणी प्राणजीवन सहयोग संस्था शिरवलचे अध्यक्ष संदिप चौकेकर यांच्या मार्गदरशनाखाली करण्यात येणार आहे.
याचा शुभारंभ मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांच्या हस्ते मळेवाड जकातनाका येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या फवारणी उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल कणकवली संस्थेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष अंकित आजगांवकर,व वेंगुर्ला तालुका अध्यक्ष गितेश शेणई व या संस्थेचे सहकारी विनायक प्रभू झांटये,अक्षय कसालकर,विश्राम कोचरेकर,श्रीराम जाधव,राजन गावडे, सीताराम नाईक,मोहन गवस, ग्रामविकास अधिकारी अनंत गावकर,लिपिक सखाराम जाधव, शिपाई सिद्धेश मुरकर आदि उपस्थित होते. मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात ज्या गावामध्ये कंटेनमेंट झोन असतील अशा ठिकाणी सॅनिटायझर व जंतुनाशक फवारणी करण्यात येणारं आहे. मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात कोरूना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझर व जंतुनाशक फवारणीसाठी प्राणीजीवन सहयोगी संस्था शिरवल कणकवली या संस्थेने जे सहकार्य केले आहे. यासाठी या संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सरपंच हेमंत मराठे यांनी आभार मानले आहेत.

