◾ओशिवरा लोखंडवाला सिटिझन फाउंडेशन च्या सहकार्याने आर एस एस जनकल्याण समितीने केले होते रक्तदान शिबिराचे आयोजन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई,दि-०७ :- ओशिवरा लोखंडवाला सिटिझन फाउंडेशन च्या सहकार्याने आर एस एस जनकल्याण समितीने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. ओशिवरा तारापोर टॉवर्स सोसायटी च्या कम्युनिटी हॉल मध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. ट्रांसफ्यूजन मेडिसिन विभाग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परेल साठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोरोना ची लस घेतली कि रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे पुढे ब्लड बँक मध्ये रक्ताचा तुटवडा भासू शकतो. म्हणून ओशिवरा लोखंडवाला सिटिझन फाउंडेशन (एन जी ओ ) चे ट्रस्टी कॅप्टन. राकेश कोएल्हो यांनी आपल्या ट्रस्ट च्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सर्व सरकारी नियमांचे पालन करून टाटा मेमोरियल हॉस्पिटल चे कर्मचारी आणि आर एस एस चे स्वयंसेवक यांनी शिस्तबध्द पध्दतीने रक्तदान शिबिर पार पाडले.

