◾जनता कर्फ्युच्या कालावधीत इन्सुली आणि पंचक्रोशीतुन होणारी खडी वाहतुक बंद करा ; इन्सुली ग्रामपंचायत तर्फे तहसीलदारांसमवेत संबंधित क्रेशर मालकांना निवेदन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴बांदा, दि-०७ :- ग्रामपंचायत इन्सुली तर्फे मा.तहसिलदार, सावंतवाडी यांना जनता कर्फ्युच्या कालावधीत होणारी खडी वाहतुक बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, इन्सुली व पंचक्रोशीत(वेत्ये,निगुडे,सोनुर्ली)येथे काळ्या दगडाच्या खाणी आहेत,तेथुन काळी खडी क्रशरवरुन गोवा येथे डंपरद्वारे वाहतूक केली जाते.इन्सुली व पंचक्रोशीतील बरेचसे डंपर मालक वरील आस्थापनासाठी आपल्या गाड्या भाड्याने देत असतात,दिवसाला कमीत-कमी ४०० ते ५०० ट्रीप सर्व क्रशरवरुन ये-जा करतात.डंपर स्थानिक असल्याकारणाने त्यावर असलेले चालक देखील स्थानिकच आहेत.जर ही वाहतूक अशीच चालू राहिली तर कोरोनाचा प्रसार रोखणे कठीण होईल, इन्सुली आणि आजुबाजुच्या गावात कोरोना रुग्ण मिळतच आहेत, तरी जनता कर्फ्युच्या कालावधीत संबंधित क्रेशरवरुन होणारी खडी वाहतूक पुर्णपणे बंद करावी अशी ग्रामपंचायतीने-इन्सुलीने विनंती केली आहे.आणि तशी निवेदने संबंधित क्रेशर मालकांना देण्यात आली आहेत.

