आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

◾हेवाळे हत्ती बाधित क्षेत्रातील स्ट्रीट लाईट च्या कामाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज ; माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य अश्विनी जाधव

 

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०२ :- हेवाळे गावातील हत्ती बाधीत क्षेत्रातील स्ट्रीट लाईटचे काम करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून सन २०१८-१९या वर्षात रु.१५.५४ लक्ष रक्कम मंजूर करण्यात आली होती त्यानुसार ढोबळ अंदाजपत्रक तयार करून तत्कालीन प्रभारी सरपंच यांनी मासिक सभेत ठराव संमत करून घेतला होता परंतु अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार सदरचे काम तांत्रिकदृष्ट्या करणे योग्य नव्हते त्यामुळे अंदाजपत्रक पुनश्च मान्यता घेण्यासाठी तत्कालीन प्रभारी सरपंच प्रयत्न करीत होते. त्या नंतर सदरची रक्कम ग्रामपंचायत मध्ये किमान दोन वर्षे पडून होती त्या वेळी जे आत्ता विरोध करतात त्यांनी पुढाकार घेऊन ते काम करणे अपेक्षित होते. त्या लोकांना हे माहीत नसेल की करोनाच्या काळात शासनाने दिलेली रक्कम जर स्ट्रीट लाईट चे काम होत नसेल तर रक्कम शासन दरबारी जमा करावी लागणार होती. सदरची रक्कम शासनास जर जमा केली असती तर ह्याच मंडळींनी ह्या विषयाचा बाहू केला असता. परंतु आताचे स्ट्रीट लाईट च्या कामाची चौकशी करण्याची मागणी करणारी ही मंडळी यावेळी सुद्धा या कामात विरोध करीत होती. तत्कालीन प्रभारी सरपंच लोकाभिमुख काम करीत असून सुद्धा याच मंडळींचा त्यांना विरोध होता व त्यांच्या विरोधात सरपंच पदासाठी माझा अर्ज भरून मला सरपंचपदी बसवून वर्षभरात याच मंडळींनी आपले प्रताप दाखवून मला सरपंच पदावरून अपात्र ठरवले होते. परंतु माझ्या प्रभागातील जनतेने मला पुन्हा खुल्या प्रवर्गातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून देत या मंडळीला त्यांची जागा दाखवुन दिली होती.

मंजूर स्ट्रीट लाईट च्या कामाला माननीय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र विद्युत कंपनी विभाग कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी तांत्रिक मान्यता प्रदान केलेली आहे. तसेच आता सुरू असलेले काम अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार सुरू आहे. या कामाची निविदा प्रक्रिया प्रशासकांच्या काळात पूर्ण झालेली आहे त्यामुळे विरोधकांनी संपूर्ण प्रकरणाची शहानिशा न करता अर्धवट ज्ञानाने कोणत्याही विकास कामांना विरोध करू नये.

तसेच बाबरवाडी मुख्य रस्ता ते लक्ष्मण शंकर नाईक यांच्या घरापर्यंत रस्त्याची नमुना नंबर 23 ला चुकीच्या पद्धतीने लावताना या मंडळींकडे सरपंच पद होते त्या वेळी त्यांनी सरपंच पदाचा गैरवापर करीत रस्त्याचे हस्तांतरण किंवा संमती पत्र न घेता रस्ता नमुना नंबर २३ ला नोंद केलेली होती व शासनाची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे या मंडळींनी आत्मपरीक्षण करावे व त्यानंतर आरोप करावे.

असे माजी सरपंच तथा सदस्य अश्विनी जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!