◾उष्म्यामुळे कलिंगडाला मागणी वाढली..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,दि-०२ :- सध्या उन्हाचा कडकपणा वाढलं असून उष्म्याने हैराण झालेला जीव शरीराला थंडावा देणाऱ्या विविध माध्यमांकडे वळताना दिसत आहे. गरमीच्या त्रासाने त्रस्त नागरिक विविध जलप्रयांना जवळ करीत द्राक्षे, कलिंगड, टरबूज या गारवा देणार्या फळांनी शरीर शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यंदा जिल्ह्यात कलिंगडाचे विक्रमी पीक आले होते. परंतु कोरोना प्रादुर्भावाने संचारबंदी असल्यामुळे तयार झालेली कलिंगडे उभ्या मळ्यात जाग्यावरच फूठून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले .काही ठिकाणी कलिंगडाची किरकोळ विक्री सुरू आहे .कलिंगडाचे या वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते परंतु ऐन सीझनच्या वेळी गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मिनी लाँकडाऊन झाले .आणि तयार कलिंगडे जाग्यावरच शेतमळ्यामध्ये खराब झाली. मुंबई गोवा रस्त्यावर ठिकाणी ठिकाणी कलिंगडाचे स्टॉल दिसायचे.यामधून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळायचा. सिंधुदुर्गातील स्थानिक कलिंगडे महाराष्ट्राबरोबरच गोवा व कर्नाटक राज्यात मुंबई जात असत .त्याचवेळी बेळगाव मधूनही काही व्यापारी टरबूज व कलिंगडाची आवक करीत असत परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा सर्वांनाच आर्थिक फटका बसला. साधारणपणे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा असा कलिंगडाचा भाव असून 40 रुपयांपासून 80,रूपये 100 रूपये 150 रुपये पर्यंत कलिंगडे उपलब्ध आहेत सिंधुदुर्गातील प्रमुख बाजारपेठेतही कलिंगडांची विक्री छोट्या-मोठ्या स्टॉलवर सुरू आहे. कलिंगडाची सध्या आवक-जावक सुरू झाली आहे.

