◾खेडमध्ये मनसेतर्फे मुस्लिम बांधवांना सरबत वाटप..
◾मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर अनेक वर्षे जपतात हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण, दि-०२ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तर्फे महाराष्ट्र सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर रमजान महिना व ईद निमीत्त खेड शहरातील मुस्लिम बांधवांना गेले अनेक वर्ष सण उत्सवातुन हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक जपत असल्याचे दिसून येत आहेत.गेल्या वर्षीपासून लाॅकडाऊन मध्ये ईप्तार पार्टी करता येत नसल्यामुळे लोकांच्या घरोघरी जाऊन सरबत बाॅटल चे वाटप करून सर्व मुस्लिम बांधवांना ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या.
सोबत सोशल डिस्टनसिंग नियमांची माहिती देऊन जनजागृती करताना उत्सवा मध्ये सहभागी झाले होते. दरवर्षी ईद , रमजान मध्ये खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांसाठी विविध उपक्रम, खाऊच्या पदार्थांचे वाटप करण्यात येते.
यावेळी मनसे शहराध्यक्ष तथा गटनेते भूषण चिखले, शहर उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, मनविसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शैलेश धारीया, मा. जिल्हा अध्यक्ष नंदू साळवी, खेड शहर उपाध्यक्ष सिद्धेश साळवी, शहर सचिव नईम चौगुले,रहिम सहिबोले, दादु नांदगांवकर, विभाग अध्यक्ष सिद्धेश पाटणे, राहुल पाटणे, प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश मिर्लेकर, संकल्प सासणे, नादिर टाके, अतुल शिंदे, रुपेश पाटणे, प्रदिप भोसले, अनिकेत कावणकर व ईतर मान्यवर उपस्थित होते.
मनसेच्या या अनोख्या उपक्रमा बदल सर्व मुस्लिम बांधवांनी मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष मा.श्री वैभवजी खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

