◾पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन बारींनी केली दत्तक घेतलेल्या कापरे गावाची पाहणी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण, दि -०१:- येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ . सचिन बारी यांनी दत्तक घेतलेल्या कापरे गावाची सलग दुसऱ्या दिवशी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत पाहणी केली .यावेळी त्यांनीं गावात आरोग्य विभागाला सोबत घेऊन नागरिकांची विचारपूस करून आरोग्य तपासणीही केली. कामकाजाची माहिती घेतानाच परिसरातील स्वच्छता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले . कोरोना पार्श्वभूमीवर येथील महसूल , आरोग्य विभाग , पोलीस यंत्रणेसह न.प. प्रशासन सतर्क झाले आहे . तालुक्यात शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत . सौम्य लक्षणे असणारे रूग्ण घरीच उपचार घेत आहेत . कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत . याशिवाय लसीकरण मोहीमसुध्दा तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर सुरू आहे . लसीकरणावरून अलिकडे ग्रामस्थ व आरोग्य विभागातील अधिकारी , कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दीक वाद होत आहेत . त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी , चिपळूण पोलीस स्थानक यांच्यावतीने शहरासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत , तेथील कामकाजाचा आढावा घेतला जात आहे . याच धर्तीवर नुकतीच येथील डीवायएसपी डॉ . सचिन बारी , पो.नि. देवेंद्र पोळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कापरे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली . आरोग्य केंद्राची पाहणी केली , कामकाज , लसीकरण , स्वच्छता यांच्यासह कोरोनाबाधित रुग्णांचीमाहिती घेतली . वैद्यकीय अधिकारी डॉ.यादव , आरोग्य सहाय्यक निवेंडकर यांना काही सूचनाही केल्या . या वेळी सरपंच विजय बांद्रे ,उपसरपंच दगडू कदम , ग्रा.पं. सदस्या आरती भुर्के , तंटामुक्ती अध्यक्ष अवधूत मारे आदी उपस्थित होते .
*डीवायएसपींनी कापरे गाव दत्तक घेऊन दिला आदर्श*
कोरोना काळातच चिपळूण मध्ये दाखल झालेल्या कोरोना निर्बंधाच्या काळात देखील आपल्या कामकाजाची चुणूक दाखवून आदर्श घालून दिला आहे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी येथील डीवायएसपी सचिन बारी यांनी तालुक्यातील कापरे गाव दत्तक घेतले आहे . कोरोना पार्श्वभूमीवर कोणती खबरदारी घ्यावी , कोणत्या उपाययोजना कराव्यात यासंदर्भात त्यांनी व पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी मार्गदर्शन केले . यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ . मिनल काणेकर , सरपंच विजय बांद्रे , उपसरपंच दगडु कदम , तंटामुक्ती अध्यक्ष अवधूत मोरे , प्राथमिक आरोग्य केंद्र कापरेचे आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर , सौ . मीना बने , ग्रामपंचायत सदस्य , ग्राम व वाडी कृती दलाचे पदाधिकारी , सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते . यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून जे काही सहकार्य लागेल ते पुरविण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन डीवायएसपी सचिन वारी यांनी दिले . त्यानंतर त्याबाबत सभा घेऊन नियोजन करण्यात आले . तसेच जनजागृतीवर भर देण्याचेही ठरवण्यात आले . पुढील काही दिवस राबविण्यात येणाऱ्या उपाय योजनांना सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच , उपसरपंच यांनी केले आहे .

