आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

◾ अपरांत हॉस्पिटल चिपळूण येथे ५ मे रोजी भव्य रक्तदान शिबिर..

 

◾सर्वांनी योगदान द्यावे ; जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण दि-०१ :- वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णांना रक्ताची चणचण भासत आहे. आपण कधीही अनुभवले नव्हते एवढे मोठे संकट कोरोना रूपाने संपूर्ण मानव जातीवर ओढवले आहे .यामुळे संपूर्ण जग हादरले आहे .याच संकट काळात माणुसकीचा ही प्रत्यंतर यायला हवा .आपल्या योगदानामुळे एखाद्याचे प्राण वाचत असतील तर यासाठी आपण जरूर योगदान द्यायला हवे .याचसाठी ५ मे रोजी अपरांत हॉस्पिटल चिपळूण येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे असे भावनिक आवाहन रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले यांनी केले. रक्तदान शिबिराच्या आढावा बैठकीत ते बोलत होते .यावेळी जिल्हा सरचिटणीस व काँग्रेसचे माजी अध्यक्ष भरत लब्धे, शहर अध्यक्ष लियाकत शहा,उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, राकेश दाते ,प्रकाश लब्धे, निलेश नारकर ,स्नेहा आमले ,श्रद्धा कदम ,केशव लांबे, प्रकाश देसाई आदी हजर होते .

रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित रक्तदान शिबिर रोटरी क्लब चिपळूण, अपरांत हॉस्पिटल व सिव्हील रक्तपेढी यांच्या सहकार्याने पार पडणार आहेत .या शिबिराचे संयोजन चिपळूण तालुका व शहर काँग्रेस कमिटी करीत आहे. शिबिरासाठी शहर तसेच ग्रामीण भागातून उत्साही प्रतिसाद लाभत आहे.अपरांत हॉस्पिटल येथे या शिबिराचे नीट नेटके आयोजन करण्यात आले असून रक्तदान करणाऱ्यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून त्यांना शासनातर्फे तसेच संयोजनाकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे .याचा उपयोग रक्तदात्यांना भविष्यात होणार आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी ४ मे दुपारी पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

भरत लब्धे-9011512929

लियाकत शहा-8805363737

सुधीर शिंदे-9890078888

प्रशांत देवळेकर-9890863449

कृष्णमूर्ती-9307566700

राकेश दाते-9970078559

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!