◾नोंदीत घरेलू कामगारांना देखील मिळणार 1500 रुपये कोविड अर्थसहाय्य..
◾स्वाभिमानी कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश…उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाकडून शासन परिपत्रक जारी..
◾राज्यातील घरेलू मंडळाकडील नोंदीत 1 लाख 5 हजार 500 घरेलू कामगारांना मिळणार लाभ ; प्रसाद गावडे
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ, दि-०१ :- दि.१३ एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्रात कोरोना संचारबंदी जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी घरेलू कामगारांना आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा केली होती. यामुळे हातावर पोट असणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये अर्थसहाय्य रक्कमेचा लाभ सदर योजनेद्वारे मिळणार होता.मात्र याबाबत शासन निर्णय पारित न झाल्याने राज्य शासनाच्या धीम्म कारभारावर बोट ठेवत संघटनेच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला होता.अखेर काल 18 दिवसानंतर शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने दि.30 एप्रिल 2021 रोजी उशिरा शासन परिपत्रक पारित करत कामगार विकास आयुक्त (असंघटित) यांना कामगारांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्याचे आदेशित केले आहे.
यामुळे राज्यातील मंडळाकडील नोंदीत १ लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी १५०० प्रमाणे १५ कोटी ८२ लाख ५० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. याशिवाय राज्यातील इमारत बांधकाम कल्याण मंडळाकडील नोंदीत 12 लाख कामगारांना 1 मे रोजी कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर 1500 रुपये अर्थसहाय्य रक्कम खात्यावर जमा करण्यात आलेली आहे.अर्थसहाय्य योजनेचा लाभ खात्यावर जमा न झाल्यास कामगारांनी हताश न होता संचारबंदी कालावधीनंतर स्वाभिमानी कामगार संघ,सिंधुदुर्ग (7972347657) येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले आहे.

