◼️रामपूर आरोग्य केंद्रासाठी सभापतींनी केली गाडीची व्यवस्था..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-०१:- तालुक्यातील रामपूर, खरवते, कापरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना नुकतीच सभापती सौ. रिया कांबळे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गाडीची व्यवस्था नसल्याची माहिती समोर आली. त्याची दखल घेऊन सभापतींनी नुकतीच रामपूर आरोग्य केंद्रासाठी तात्पुरती भाडेतत्वावर गाडीची व्यवस्था केली आहे. याबद्दल येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यासाठी पंचायत समिती सदस्य य युवा नेते नितीन ठसाळे यांनी देखील पुढाकार घेतला आहे.
चिपळूण पंचायत समिती सभापती पदाचा कार्यभार काही दिवसांपूर्वी सौ. रिया कांबळे यांनी घेतला आहे. यानंतर कोविड परिस्थितीला प्राधान्य देत चिपळुणातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यामध्ये रामपूर, खरवते, कापरे तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी रामपूर आरोग्य केंद्रासाठी गाडीची व्यवस्था नसल्याची माहिती येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली. कोवाड परिस्थिती लक्षात घेऊन सोबतीने तात्काळ या आरोग्य केंद्रासाठी नुकतीच महिनाभरासाठी तात्पुरती गाडीची व्यवस्था केली आहे. तात्काळ गाडीची व्यवस्था केल्याबद्दल रामपूर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

