आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾मास्कच्या अयोग्य वापरामुळे मूळ हेतूलाच बाधा..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,दि-३० :- कोरोना संसर्गाच्या भीतीने मास्क वापराबाबत समाजात जागरूकता वाढली आहे. ही समाधानाची बाब असली तरी मास्कचा वापर योग्य पद्धतीने होत नसल्याने मास्क वापराच्या मूळ हेतूलाच बाधा पोचत आहे. काही नागरिक तर मास्क एक फॅशन म्हणून केवळ हनुवटीवर लावून फिरताना दिसून येत आहेत. राज्य शासनाने कडक लॉकडाऊन जरी केले असले तरी सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने भाजी, दूध, मच्छी, वर्तमानपत्रे, किराणा सामान खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडतात. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक बाजारपेठांमधून सकाळच्या वेळेत नागरिकांची गर्दी दिसून येते. मास्क वापराबाबत वारंवार आवाहन करूनही अनेक नागरिक बाजारपेठांमधून वीनामास्क फिरत असतात किंवा मास्क लावलाच असेल तर तोंडावर व्यवस्थित न लावता एक फॅशन म्हणून हनुवटीवर दिसून येतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याचा मूळ हेतू साध्य होत नसल्याचे भानही अशा नागरिकांना नसते. सर्व सामान्य नागरिकांपासून शासकीय, खाजगी ऑफिस मध्ये काम करणारे कर्मचारी मास्क व्यवस्थित लावताना दिसत नाहीत. केवळ पोलिस नगरपालिका ग्रामपंचायत कर्मचारी कारवाई करताना दिसले की मास्क नाकावर घेतला जातो. तर शासकीय खाजगी ऑफिस मध्ये वरिष्ठांच्या समोर मास्कचा वापर केला जातो. नाहीतर हा मास्क केवळ फॅशन म्हणून नागरिकांच्या हनुवटीवर दिसून येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!