आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾धान्य दुकाना वरील थम मशिनद्वारे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता..

 

◾ याबाबत शासनाने लवकरात लवकर आदेश काढून ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्याची व्यवस्था करावी ; ग्रामस्थांची मागणी..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴 दोडामार्ग,दि-३० :- सध्या कोरोनाने सर्वत्रच थैमान घातलेले आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता शासन नागरिकांच्या संरक्षणा साठी वेगवेगळे निर्णय घेत आहे.

कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता सर्व शासकीय कार्यालये , खाजगी आस्थापने या ठिकाणी थम मशीन द्वारे हजेरी घेणे बंद केले असताना, धान्य दुकानावर मात्र थम लावून धान्य वितरीत केले जाते. त्यामुळे कोरोनचा प्रसार झपाटयाने होण्याची शक्यता आहे.

तसेच ग्रामिण भागात इंटरनेटची सुविधा व्यवस्थित नसल्यामुळे नागरिकांना तासनतास धान्य दुकाना समोर तातकळत उभे राहावे लागते. त्यामुळे धान्य दुकाना समोर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी व थम मशीन द्वारे होणारा कोरोनाचा प्रसार टाळण्यासठी शासनाने याबाबत लवकरात लवकर आदेश काढून ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरीत करण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी ग्रामस्थां मधुन केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!