Uncategorizedकणकवलीकोकणसिंधुदुर्ग

कणकवली बाजारपेठेत तुफान गर्दी…

◼️सोशल डिस्टसिंगचे वाजले तीन – तेरा

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ३० मध्ये सर्व पक्षीय बैठक घेत, १ मे ते १० मेपर्यंत जनता कर्फ्यु लागु केला आहे. याला व्यापरी संघ, नगरसेवक, नगराध्यक्ष, रिक्षा चालक – मालक संघटना, रास्त धान्य दुकाने बंद राहणार आहेत.

याच पार्शवभूमीवर आज कणकवली शहरात आणि संपुर्ण बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळाली. नगरपंचायत कर्मचारी, पोलिस प्रशासन ही गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु नागरिक कोणाचे ऐकत नसल्याचे आढळून आले.

त्यामुळे पोलिस प्रशासन आणि नगरपंचायत कर्मचारी यांनी भाजीची दुकाने आणि किराणा मालाची दुकाने बंद करायला लावली. ही गर्दी कमी करताना पोलिस अधिकारी, होमगार्ड आणि नगरपंचायत कर्मचारी यांच्या नाकेनाऊ आले आहेत.

या अशा झालेल्या गर्दीत एक जरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आणि हाच रुग्ण १० जणांच्या संपर्कात आला. तर १० चे १०० रुग्ण होणार हे नक्की.

त्यामुळे पोलिस प्रशासन आणि नगरपंचायत कर्मचारी यांनी सर्वांना स्वतःची काळजी स्वतः घ्या, गर्दी करू नका. तुमचं देखील कुठुंब तुमची घरी वाट बघत आहेत. तुमच्या एका चुकीमुळे कोरोना तुमच्या घरी स्वतःच घेऊन जाणार आहात, असे भावनिक आव्हाहन करत गर्दी कमी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!